आपुलकी आणि दूरदृष्टी असलेली कंपनी, गृहम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये आपले स्वागत आहे!
TPG ग्रुपच्या पाठबळावर, आम्ही RBI-रजिस्टर्ड हाऊसिंग फायनान्स कंपनी असून अफोर्डेबल हाऊसिंग फायनान्स यावर खास लक्ष केंद्रित करतो. आमचे सुलभ आणि अफोर्डेबल हाऊसिंग फायनान्स सोल्यूशन भारतातील सेमी-अर्बन आणि पेरी-अर्बन मधील आमच्या कस्टमरच्या युनिक गरजा पूर्ण करण्यासाठी आहेत. यामध्ये घर सुधारणा, विस्तार, घर बांधणी लोन, बॅलन्स ट्रान्सफर आणि लोन अगेंस्ट प्रॉपर्टी यांचा समावेश आहे. ग्राहकांचे कल्याण याला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देत आहोत. गृहम मध्ये, आम्ही ऑनलाईन सोयीसह आणि घरपोच वैयक्तिक मदतीद्वारे त्यांचे जीवन, मालमत्ता आणि आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करतो.
'गृहम' हे फक्त एक ब्रँड नाव नाही, तर एक भावना आहे, जी आमची बिझनेस कॅटेगरी, होम ('गृह') फायनान्स आणि कस्टमर ('हम') यांच्या सोबतचा आमचा एकत्रितपणा आणि सहकार्य यांना जोडून ठेवते. विशेषतः कमी आणि मध्यम-उत्पन्न गटातील, स्वतःच्या मेहनतीवर उभे राहिलेले सेल्फ-मेड इंडिव्हिज्युअल्स (SMIs), यांच्यासाठी घर मालकी म्हणजे फक्त डोक्यावर छप्पर नव्हे - तर तो एक अभिमान आहे आणि ती एक ओळख आहे, याची आम्हाला पुरेपुर जाणीव आहे. आमचे ब्रँड स्लोगन "आपले घर, आपली ओळख" आमच्या कस्टमर्सच्या भावनांना खोलवर स्पर्श करते, कारण स्वतःचं घर असणे म्हणजे त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचं खरं प्रतिबिंब असणे होय.
आमची स्ट्रॅटेजी आहे, 'गो होम लोन - गो डायरेक्ट'. आम्ही आमच्या कस्टमर्सच्या विशिष्ट गरजांसाठी तयार केलेले थेट ॲक्सेस करण्यायोग्य आणि अफोर्डेबल हाऊसिंग फायनान्स सोल्यूशन प्रदान करतो. 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेल्या 200 ब्रँचच्या मजबूत नेटवर्कमुळे, गृहम आपल्या कस्टमर्सना थेट सेवा देण्यास कटिबद्ध आहे, ज्यामध्ये पारदर्शकता, सुलभता आणि आदर यांना प्राधान्य दिले जाते. ₹9374+ कोटींचे ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट (AUM) हे 85,000+ समाधानी कस्टमर्सनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे.
आमच्याकडे चांगले वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ आहे, ज्यामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग लोन वर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. आमच्या ऑफरमध्ये पुढील समाविष्ट आहे.
चला, एकत्र येऊन आपला घरमालकीचा प्रवास यशस्वी करूया.
खऱ्या भारतातील घर मालकीची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सर्वात विश्वसनीय भागीदार होणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
आम्ही स्वतःच्या मेहनतीने उभे राहिलेल्या व्यक्तींसाठी घरमालकीचा प्रवास सुलभ, सन्मानपूर्वक आणि अखंड व्हावा यासाठी कटिबद्ध आहोत.
विनम्रता
विश्वास
एकत्वाची भावना
ब्रँच भारताच्या
18 राज्यांत
आनंदी कस्टमर्स
ॲसेट अंडर मॅनेजमेंट
(AUM)
कर्मचारी