गृहम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडला समजते की तुम्ही www.grihumhousing.com वर ब्राउजर म्हणून किंवा ग्राहक, व्हिजिटर, गेस्ट, रजिस्टर्ड यूजर किंवा वेबसाईट ब्राउज करणारे इतर (“तुम्ही" किंवा "यूजर”) म्हणून तुमच्या प्रायव्हसीला महत्त्व देता. प्रायव्हसी पॉलिसी ही वेबसाईटवरील गृहम कडून वापरकर्त्यांना दिल्या जाणाऱ्या सर्व प्रॉडक्ट्स आणि सेवा ("प्रॉडक्ट्स") यांच्याशी संबंधित आहे.
ही प्रायव्हसी पॉलिसी वेबसाईटवरील सर्व युजरसाठी लागू असलेल्या गृहमच्या प्रायव्हसी पद्धती स्पष्ट करते. गृहम तुमच्या वैयक्तिक डाटाचे संरक्षण अत्यंत गंभीरपणे घेते आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000, माहिती तंत्रज्ञान (वाजवी सुरक्षा पद्धती आणि प्रक्रिया आणि संवेदनशील वैयक्तिक डाटा किंवा माहिती) नियम, 2011 यांचे काटेकोरपणे पालन करते.
मी स्वीकार करत आहे” वर क्लिक करून आणि/किंवा वेबसाईटवर लॉग-इन करून, तुम्ही प्रायव्हसी पॉलिसी आणि त्यातील सर्व अटी व शर्ती मान्य करत आहात. तुम्ही एखाद्या संस्था, फर्म किंवा कंपनीचे प्रतिनिधित्व करत असल्यास, “मी स्वीकार करत आहे” वर क्लिक करणे म्हणजे तुम्ही त्या संस्था, फर्म किंवा कंपनीला देखील प्रायव्हसी पॉलिसीद्वारे बांधील ठेवत आहात. तुम्ही प्रायव्हसी पॉलिसी मधील सर्व अटी व शर्ती मान्य करत नसल्यास, “कॅन्सल” वर क्लिक करा. अशा परिस्थितीत, तुम्हाला वेबसाईट वापरण्याचा कोणताही हक्क राहणार नाही आणि पुढे वेबसाईटवर ॲक्सेस देण्यात येणार नाही. प्रायव्हसी पॉलिसी म्हणजे गृहम कडून (जोपर्यंत तुम्ही कोणत्याही पर्यायावर क्लिक करत नाही तोपर्यंत) तुम्हाला वेबसाईट ॲक्सेस/वापरण्यासाठी दिलेली एक ऑफर मानली जाईल, आणि तुम्ही “मी स्वीकार करत आहे” वर क्लिक करताच त्याची स्वीकृती मानली जाईल, ज्यामुळे प्रायव्हसी पॉलिसी हा कायद्याने बंधनकारक असा एक करार बनेल ("करार").
प्रायव्हसी पॉलिसी आणि गृहमच्या अटी व शर्ती स्वीकारताना, तुम्ही स्पष्टपणे गृहम कडून तुमची वैयक्तिक तसेच इतर माहिती प्रायव्हसी पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या पद्धतीने वापरणे आणि उघड करणे यास संमती देत आहात. कृपया नोंद घ्या की, तुम्ही प्रायव्हसी पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या वापर आणि माहिती उघड करण्याच्या स्वीकृती विद्ड्रॉल केल्यास, गृहम कडे वेबसाईटवर दिले जाणारे प्रॉडक्ट्स न देण्याचा पर्याय उपलब्ध राहील.
प्रायव्हसी पॉलिसी युजरविषयी गोळा केलेल्या माहितीचे उपचार आणि संरक्षण वर्णन करते:
आम्ही कलेक्ट केलेली माहिती
प्रायव्हसी पॉलिसीमध्ये वेबसाईट कलेक्ट करते आणि/किंवा प्राप्त करते ती वैयक्तिक माहिती समाविष्ट आहे, ज्यामध्ये वेबसाईटच्या तुमच्या मागील वापराशी संबंधित माहिती, वापरकर्त्यांचे सबमिशन, वैयक्तिक माहिती आणि गृहमच्या प्रॉडक्ट्सच्या तुमच्या मागील वापराशी संबंधित माहिती समाविष्ट आहे. या गोपनीयता धोरणाच्या उद्देशाने याला एकत्रितपणे "माहिती" म्हणून संबोधले जाईल.
वैयक्तिक माहिती
पर्सनल माहिती म्हणजे अशी कोणतीही माहिती जी तुमची ओळख पटवण्यासाठी, तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी किंवा तुम्हाला शोधण्यासाठी वापरता येते. यामध्ये तुमचे नाव, घर आणि बिझनेस ॲड्रेस, ईमेल ॲड्रेस, संपर्क तपशील, पेमेंट तपशील आणि इतर अशी माहिती समाविष्ट असते जी सार्वजनिकरीत्या उपलब्ध नसते. पर्सनल माहितीची सत्यता ही पूर्णपणे युजरची जबाबदारी आहे आणि याबाबत गृहमला जबाबदार धरण्यात येणार नाही. घेतलेला डाटा विकला जाणार नाही किंवा परवानगी नसलेल्या कोणत्याही वापरासाठी थर्ड पार्टीला दिला जाणार नाही. ज्यांनी त्यांच्या प्रोफाईलवर वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती दिलेली आहे अशा युजरना गृहम त्यांच्या प्रोफाईलमधील काही मर्यादित माहिती संपादित करण्याची परवानगी देऊ शकते, जेणेकरून त्यांची वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती बरोबर आणि अप-टू-डेट राहील.
वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती
विविध सेवा किंवा वैशिष्ट्ये प्रदान करताना, गृहम तुम्हाला वैयक्तिक माहिती प्रदान करण्यास सांगू शकते. उदाहरणार्थ, तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस, नाव, टेलिफोन नंबर, रस्त्याचा ॲड्रेस, ईमेल ॲड्रेस, वय, लिंग इ. प्रदान करण्यास सांगितले जाऊ शकते.
नॉन-पर्सनल आयडेंटिफायेबल माहिती
वैयक्तिक नसलेल्या माहितीमध्ये तुमचा IP ॲड्रेस, कुकीज, थर्ड-पार्टी कुकीज आणि वेबसाईटवर तुम्ही पाहिलेले वेब पेज समाविष्ट आहेत परंतु त्यापुरते मर्यादित नाहीत. वैयक्तिक नसलेली माहिती ही अशी माहिती आहे जी स्वतःहून, विशिष्ट व्यक्तीपर्यंत ट्रॅक केली जाऊ शकत नाही. तुम्ही वेबसाईटला भेट देत असताना गृहम वैयक्तिक नसलेली माहिती घेऊ शकते. प्रॉडक्ट्स प्रदान करताना, गृहम तुमचा IP ॲड्रेस, तुम्ही भेट दिलेल्या वेबसाईटवरील वेब पेज, वेळ आणि तारीख आणि तुम्ही जाहिरातींवर क्लिक केले आहे की नाही ("वेब सर्फिंग डाटा") यासारखा वेब सर्फिंग डाटा घेऊ शकते. गृहम ही माहिती घेण्यासाठी विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करते, ज्यामध्ये कुकीज आणि सिंगल-पिक्सेल GIF समाविष्ट आहेत.
जर तुमचा ब्राउजर कुकीज स्वीकारण्यासाठी कॉन्फिगर केला असेल तर या कुकीजचा वापर तुम्ही वेबसाईटला पुन्हा भेट देता तेव्हा तुमच्या कॉम्प्युटरला ओळखण्यासाठी केला जाईल जेणेकरून तुम्हाला वेबसाईटवर पुनः भेट दिल्यावर चांगला युजर अनुभव मिळेल आणि कामगिरी सुधारण्यास मदत होईल. तथापि, जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कुकीज ब्लॉक करण्यासाठी तुमचा ब्राउजर कॉन्फिगर करू शकता.
प्रॉडक्ट आणि वेबसाईटवर थर्ड-पार्टीच्या जाहिराती दिसू शकतात. तुम्ही एखाद्या जाहिरातीवर किंवा लिंकवर क्लिक करण्याचा निर्णय घेतल्यास,गृहम कडून त्या जाहिरातदाराला आणि/किंवा वेब पब्लिशरला वैयक्तिक ओळख पटणार नाही अशी माहिती दिली जाऊ शकते. तसेच, तुम्ही अशा थर्ड-पार्टीच्या वेबसाईट्सला भेट देता तेव्हा जाहिरातदार किंवा वेब पब्लिशर कुकी किंवा इतर तंत्रज्ञान वापरून तुमची माहिती घेऊ शकतात. जाहिरातदार किंवा इतर थर्ड पार्टीकडून घेतली जाणारी माहिती त्यांच्या स्वतःच्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार नियंत्रित केली जाते, गृहमच्या प्रायव्हसी पॉलिसीनुसार नाही.
गृहमच्या समूह कंपन्या, उपकंपन्या, सहयोगी किंवा सहयोगी ("पार्टनर्स") त्यांच्या वेबसाईटद्वारे प्रॉडक्ट/सेवा प्रदान करू शकतात, ज्यामध्ये प्रॉडक्टची रचना करणे समाविष्ट आहे. पार्टनर ज्या प्रमाणात माहिती घेतात त्या प्रमाणात त्या माहितीचे व्यवस्थापन पार्टनर्सच्या प्रायव्हसी पॉलिसीद्वारे नियंत्रित केले जाते,गृहमच्या प्रायव्हसी पॉलिसीद्वारे नाही. यूजरने लागू असलेल्या प्रायव्हसी पॉलिसींची माहिती ठेवणे आवश्यक आहे.
गृहम च्या पार्टनर किंवा जाहिरातदार यांच्याकडून होणाऱ्या प्रमोशन दरम्यान, गृहम कधी कधी समान माहिती पुन्हा विचारू शकते.
आम्ही कलेक्ट केलेल्या माहितीचा वापर
वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहितीचा वापर
गृहम खाली दिलेल्या प्रकरणांशिवाय जाणूनबुजून थर्ड पार्टीला वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती देत नाही: जर तुम्ही एखाद्या जाहिरातदार किंवा पार्टनरकडून मिळणाऱ्या प्रॉडक्ट किंवा सेवांबद्दल चौकशी करताना तुमची वैयक्तिक माहिती दिली असेल, किंवा गृहम कडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या प्रमोशनल ऑफर्स मध्ये सहभागी होताना दिली असेल, तर ती माहिती त्या जाहिरातदार किंवा पार्टनर किंवा स्पॉन्सर किंवा को-स्पॉन्सर यांना दिली जाऊ शकते, जेणेकरून ते तुम्हाला चौकशी केलेल्या प्रॉडक्ट किंवा ऑफरबाबत माहिती देऊ शकतील.
गृहम क्रेडिट रिपोर्टिंगसाठी, ट्रान्झॅक्शनच्या संकलनासाठी, आंतरिक उद्देशांसाठी, जसे की सेल्स, मानव संसाधने, मार्केटिंग आणि ॲडमिनिस्ट्रेशन यासाठी युजरद्वारे प्रदान केलेली वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहितीचा वापर करू शकते. याशिवाय, कायद्याच्या अधीन राहून, गृहम ही वैयक्तिक माहिती वैधानिक प्राधिकरणांना किंवा कोणत्याही नियामक संस्थांना देखील पुरवू शकते.
गैर-वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहितीचा वापर
गृहम आपल्या सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी गोळा केलेली वैयक्तिकरित्या ओळखता न येणारी माहितीचा वापर करू शकते, ज्यामध्ये सेवा किंवा तंत्रज्ञानाच्या समस्यांचे निदान करणे, सुरक्षिततेचे मूल्यांकन करणे आणि देखभाल करणे, तुमच्या अनुभवाची गुणवत्ता सुधारण्यासाठी तुमचे मागील अंदाज दाखवणे, तुम्हाला अशा जाहिराती सादर करणे ज्या गृहमला वाटतील की तुम्हाला पाहण्यात रस असेल किंवा तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरवर गृहम मध्ये लॉग-इन राहण्याची परवानगी देणे यांचा समावेश आहे. गृहम परत येणाऱ्या वापरकर्त्यांची गणना करण्यासाठी आणि ओळखण्यासाठी देखील माहितीचा वापर करू शकते.
गृहम कोणत्याही थर्ड-पार्टीला माहिती प्रदान करू शकते जे यूजर डेमोग्राफिक, आवडी-निवडी आणि वर्तन निर्धारित करण्यासाठी वेब सर्फिंग डाटावर संशोधन करतील आणि संभाव्य जाहिरातदार किंवा पार्टनरसह वेब सर्फिंग डाटा शेअर करून प्रॉडक्ट आणि वेबसाईट मार्केट करू शकतात. जर असे केले तर गृहम वेब सर्फिंग डाटा अशा प्रकारे शेअर करेल की युजर्स ओळखले जाणार नाहीत. उदाहरणार्थ, गृहम जाहिरातदाराला जनसांख्यिकीय किंवा युसेज माहिती प्रदान करू शकते जेणेकरून त्यांना समजेल की विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील किती रजिस्टर्ड यूजर आहेत किंवा मागील महिन्यात कोणत्या जाहिरातीवर क्लिक झाले आहे. गृहम तुमची गैर-वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती काँट्रॅक्टरना देखील प्रदान करू शकते जेणेकरून ते गृहम साठी सेवा देऊ शकतील.
गृहम अशी हमी देत आहे की या वेबसाईटवर दिलेली माहिती किंवा प्रॉडक्ट आणि वेबसाईटच्या मागील वापरासंबंधी माहिती, या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या परिस्थितीशिवाय कोणत्याही थर्ड पार्टीला प्रदान, वितरित, ट्रेड, विक्री किंवा रेंट करणार नाही.
साधारणतः, गृहम तुमची सर्व माहिती एकत्रितपणे गोळा करतो. गृहम ही माहिती एकत्रित स्वरूपात वापरतो आणि कायद्याने आवश्यक नसल्यास ती उघड करत नाही. हे गृहमला सतत युजरसाठी एक चांगला अनुभव देण्यास मदत करते. गृहम ही माहिती आपल्या पार्टनर्स सोबतही शेअर करेल, पण फक्त एकत्रित स्वरूपात, जेणेकरून त्यांनाही समजेल की तुम्ही, एकत्रित स्वरूपात वेबसाईट आणि प्रॉडक्ट्स कसे वापरतात.
गृहम स्टँडर्ड इंटर्नल चेक/उपाययोजना करून सुनिश्चित करेल की माहितीचे कोणतेही अनधिकृत निरीक्षण किंवा संकलन केले जात नाही, आणि उद्योग मानकांनुसार आणि लागू कायद्यानुसार माहितीची गुप्तता आणि गोपनीयता राखली जात आहे.
तुम्ही सहमती देता की, गृहम तुमच्याबद्दलची माहिती त्याच्या मार्केटिंग आणि प्रमोशनल उपक्रमांना सुधारण्यासाठी, वेबसाईटचा वापर कसा होतो याचे विश्लेषण करण्यासाठी, त्यातील कंटेंट आणि प्रॉडक्ट ऑफरिंग सुधारण्यासाठी, तसेच वेबसाईट आणि प्रॉडक्टचा कंटेंट आणि लेआऊट तुमच्यासाठी अधिक योग्य बनवण्यासाठी वापरू शकते. याव्यतिरिक्त, तुम्ही सहमती देता की, गृहमला सबमिट केलेली सर्व माहिती गृहम आपले अधिकृत कर्मचारी आणि गृहमने नेमलेल्या थर्ड पार्टीसोबत त्याच पद्धतीने वापरली आणि उघड केली जाऊ शकते, ज्या पद्धतीने गृहमला तुम्ही दिलेली माहिती वापरण्याचा आणि उघड करण्याचा अधिकार आहे.
याव्यतिरिक्त, तुम्ही सहमती देता की, गृहम तुमच्याबद्दलची माहिती आणि साईटवर तुमच्या क्रियाकलापांमधून मिळालेली इतर कोणतीही माहिती समस्यांचे निवारण करण्यासाठी, गृहमच्या अटी व शर्ती आणि इतर संबंधित समस्यांची अंमलबजावणी करण्यासाठी वापरू शकते.
याव्यतिरिक्त, तुम्ही जेव्हा वेबसाईटवर स्वेच्छेने तुमची वैयक्तिक ओळख पटवणारी माहिती (जसे की युजरचे नाव, ई-मेल ॲड्रेस किंवा इतर कोणतीही वैयक्तिक माहिती) शेअर करता, तेव्हा ती माहिती आणि युजरने दिलेली इतर कोणतीही माहिती थर्ड पार्टीकडून घेऊन वापरली जाऊ शकते आणि त्यामुळे इतर युजर्स किंवा थर्ड पार्टीकडून अनपेक्षित मेसेज येऊ शकतात. अशा प्रकारच्या कृती गृहम च्या नियंत्रणाबाहेर आहेत आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिणामांसाठी गृहम जबाबदार राहणार नाही.
इंटरनॅशनल यूजर:
ही वेबसाईट भारतात होस्ट केली आहे. जर तुम्ही अशा कोणत्याही देशातून वेबसाईट वापरत असाल जिथे डाटा कलेक्ट करणे आणि वापरणे याबाबतचे कायदे भारतापेक्षा वेगळे आहेत, तर कृपया लक्षात घ्या की तुम्ही तुमची माहिती भारतात ट्रान्सफर करत आहात. भारतातील डाटा संरक्षणाचे कायदे तुमच्या देशासारखे असतीलच असे नाही. तुमची माहिती देऊन, तुम्ही या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या उद्देशांसाठी तुमची माहिती वापरण्यास आणि वरीलप्रमाणे ती भारतात ट्रान्सफर करण्यास संमती देत आहात.
सुरक्षा:
तुम्ही गृहमला पाठवलेली कोणतीही माहिती पूर्णपणे सुरक्षित राहील याची गृहम हमी देऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही माहिती स्वतःच्या जोखमीवर प्रदान करता. एकदा गृहमला तुमची माहिती मिळाल्यावर, गृहम आपल्या सिस्टिमवर योग्य सुरक्षा ठेवण्यासाठी वाजवी प्रयत्न करेल. गृहम अनधिकृत ॲक्सेस, प्रकटीकरण, बदल किंवा नष्ट होण्यापासून तुमची माहिती वाचवण्यासाठी सिक्युअर सर्व्हर सॉफ्टवेअर आणि फायरवॉल सारख्या स्टँडर्ड सुरक्षा पद्धतींचा वापर करते.
गृहमकडे माहितीचे संरक्षण करण्यासाठी पॉलिसी आणि प्रक्रिया आहेत. सर्व तांत्रिक आणि कार्यात्मक सुरक्षा कार्ये धोरणांद्वारे नियंत्रित आणि व्यवस्थापित केल्या जातात. आम्ही माहिती आणि सायबर सुरक्षेवर सर्व इंडस्ट्री चांगल्या पद्धतींचे पालन करतो.
या सुरक्षा पद्धती आणि पॉलिसी लागू करून, गृहमने वाजवी सुरक्षा पद्धती आणि प्रक्रियेचे पालन केले असल्याचे मानले जाईल. मात्र, याचा अर्थ असा नाही की अशा फायरवॉल आणि सुरक्षित सर्व्हर सॉफ्टवेअरच्या ब्रीच मुळे ही माहिती ॲक्सेस, उघड, बदलली किंवा नष्ट होणार नाही, याची हमी नाही. कायद्याने परवानगी असलेल्या मर्यादेपर्यंत, कोणत्याही सिक्युरिटी ब्रीच किंवा तुमची माहिती गमावण्याशी गृहम कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही.
कोणत्याही परिस्थितीत, गृहम कोणत्याही विशेष, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा परिणामी नुकसानीसाठी जबाबदार राहणार नाही, ज्यामध्ये मर्यादा न ठेवता, नफा गमावणे, बिझनेस संधी गमावणे किंवा प्रदान केलेल्या माहितीचा गैरवापर झाल्यास डाटा गमावणे यांचा समावेश आहे.
गृहम आपल्याला प्राप्त झालेली माहिती गमावणे, नुकसान, गैरवापर आणि बदल यापासून संरक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करते. यामध्ये सुरक्षित सर्व्हर टेक्नोलॉजी चा वापर समाविष्ट असू शकतो. मात्र, युजरने हे लक्षात घ्यावे की इंटरनेट पूर्णपणे सुरक्षित नाही. त्यामुळे इंटरनेटद्वारे गृहमला पाठवलेल्या माहितीची सुरक्षा गृहम सुनिश्चित करू शकत नाही आणि अनवधानाने झालेल्या कोणत्याही माहितीच्या प्रकटीकरणासाठी गृहम कोणतेही दायित्व स्वीकारत नाही.
प्रॉडक्ट्स आणि वेबसाईट्स हे पासवर्ड-प्रोटेक्टेड आहेत. युजरनी आपले पासवर्ड कोणाशीही शेअर करू नयेत. तुम्ही कोणतीही अशी कृती करू नये ज्यामुळे सिक्युरिटी ब्रीच होऊ शकते, आणि योग्य परवानगीशिवाय प्रॉडक्ट आणि वेबसाईटचे पासवर्ड-प्रोटेक्टेड क्षेत्र ॲक्सेस करण्याचा प्रयत्न करू नये.
गोपनीयता
येथे काहीही असले तरी, माहितीच्या संदर्भात गोपनीयतेच्या कोणत्याही जबाबदाऱ्या अस्तित्वात राहणार नाहीत जे:
ही प्रायव्हसी पॉलिसी फक्त गृहम तुमच्याकडून कलेक्ट करत असलेल्या माहितीचा वापर आणि प्रकटीकरण यावरच लक्ष केंद्रित करते. तुम्ही इतर पार्टींना माहिती उघड करता, मग ते वेबसाईटवर असो किंवा नसो, तुम्ही त्यांना उघड करत असलेल्या माहितीच्या वापरावर किंवा प्रकटीकरणावर वेगवेगळे नियम लागू होऊ शकतात. गृहम या थर्ड पार्टीच्या प्रायव्हसी पॉलिसीवर नियंत्रण ठेवत नाही.
तुमची विनंती करण्यासाठी किंवा तुमची माहिती संरक्षित करण्यासाठी कायद्यांतर्गत वाजवीपणे परवानगी नसल्यास गृहम तुमची माहिती थर्ड पार्टीसोबत शेअर करत नाही. वर नमूद केलेल्या गोष्टी असूनही, थर्ड पार्टीनी तुमची माहिती कशी वापरली, यावर प्रायव्हसी पॉलिसी लागू होत नाही. त्यामुळे गृहमला थर्ड पार्टीकडून तुमच्या माहितीच्या वापरासाठी जबाबदार धरले जाऊ शकत नाही, कारण त्यावर गृहमचे नियंत्रण नाही.
विद्यमान नियामक चौकटी आणि विद्यमान कायद्यांमुळे, गृहम या गोष्टीची हमी देऊ शकत नाही की तुमची माहिती या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या मार्गांशिवाय कधीच उघड केली जाणार नाही. खाली दिलेल्या परिस्थितींमध्ये गृहम तुमची माहिती उघड करू शकते:
सक्षम अधिकारक्षेत्राच्या न्यायालयाद्वारे किंवा न्यायिक किंवा प्रशासकीय एजन्सी किंवा विधायी संस्थेद्वारे जारी केलेल्या ऑर्डर किंवा चौकशीच्या अनुषंगाने किंवा कायदा, नियम, नियमन किंवा मार्गदर्शक तत्त्वांच्या कोणत्याही तरतुदींनुसार आवश्यक असल्याप्रमाणे गृहमला तुमची माहिती तुमच्या पूर्व संमतीशिवाय उघड करणे आवश्यक असू शकते.
कायदा अंमलबजावणी यंत्रणेला गृहम आपले हक्क, प्रॉपर्टी किंवा इतर हितसंबंध, ज्यात ग्राहक किंवा युजर्सचे हित सुद्धा समाविष्ट आहे, संरक्षित करण्यासाठी किंवा चुकीच्या/बेकायदेशीर कृतींना किंवा गृहमच्या अटी व शर्तींच्या उल्लंघनाला आळा घालण्यासाठी माहिती जारी करू शकते.
गृहम तुमच्या माहितीचा ॲक्सेस असलेल्या इतर सहाय्यक कंपन्या किंवा संलग्न संस्थांशी एकत्रित केलेल्या माहितीसह आपला डाटा शेअर करू शकते. गृहम हे सुनिश्चित करेल की तुमची माहिती त्यांच्या प्रायव्हसी पॉलिसी अंतर्गत योग्य संरक्षणात राहील.
जर गृहम पूर्ण किंवा अंशतः एखाद्या कंपनीसोबत पार्टनरशिप/कोलाबोरेशन करत आहे, किंवा कोणत्याही कंपनीने गृहमला अधिग्रहित किंवा विलीन केले, तर संकलित केलेली माहिती त्या पार्टनर/कोलाबोरेटर किंवा अधिग्रहित/ विलीन केलेल्या कंपनीकडे ट्रान्सफर केली जाऊ शकते.
गृहमच्या सेवांमध्ये वेब पब्लिशर आणि जाहिरातदारांकडून आलेला कंटेन्ट समाविष्ट असतो. प्रॉडक्ट आणि वेबसाईटमध्ये जाहिरातदारांच्या लिंकसह इतर वेबसाईट्सची लिंक असू शकतात. याशिवाय, जर सबमिशन मध्ये इतर वेबसाईट्सची लिंक असू शकतात. गृहम वेब पब्लिशर, जाहिरातदार किंवा इतर वेबसाईटच्या वेबसाईट किंवा कंटेंटसाठी जबाबदार नाही, ज्या प्रॉडक्ट्स आणि वेबसाईटशी लिंक असू शकतात.
माहिती अपडेट करणे
तुमच्या माहितीमध्ये बदल झालेले असल्यास किंवा तुम्ही वेबसाईट वापरत नसल्यास, तुम्ही तुमचा युजर अकाउंट दुरुस्त करण्यासाठी, अपडेट करण्यासाठी, बदलण्यासाठी, हटवण्यासाठी किंवा डिलिट करण्यासाठी गृहम शी customersupport@grihumhousing.com वर ईमेलद्वारे संपर्क करू शकता. तुम्ही दिलेल्या माहितीच्या सत्यतेसाठी ग्रिहम जबाबदार राहणार नाही.
सदस्यत्वाचे निलंबन
तुमच्या लेखी विनंतीवर, गृहम तुमचे मेंबरशिप थांबवेल आणि तुमची माहिती त्यांच्या ॲक्टिव्ह डाटाबेसमधून हटवेल. अशा माहितीला शक्य तितक्या लवकर गृहमच्या धोरणांनुसार आणि लागू कायद्यांनुसार हटवले जाईल. तरीही, गृहम तुमची माहिती काही ठराविक परिस्थितींमध्ये वापरण्यासाठी ठेवू शकतो (जरी इतरांना दिसणार नाही), जसे की विवादांचे निराकरण करण्यासाठी, समस्या निवारणासाठी, अटी व शर्ती अंमलात आणण्यासाठी आणि लागू कायद्यांनुसार आवश्यक असल्यास. याव्यतिरिक्त, तांत्रिक आणि कायदेशीर कारणांमुळे ही आधीची माहिती गृहमच्या डाटाबेसमधून पूर्णपणे हटवली किंवा डिलीट केली जाऊ शकत नाही, ज्यामध्ये स्टोअर केलेले बॅकअप सिस्टम्स आणि आर्काइव्स समाविष्ट आहेत. युजर सहमत आहे की, तांत्रिक आणि कायदेशीर मर्यादानुसार तुमच्या विनंतीनुसार सर्व माहिती गृहमच्या डाटाबेसमधून पूर्णपणे हटवली किंवा डिलीट केली जाऊ शकत नाही.
बदल आणि संपर्क:
गृहम वेळोवेळी ही प्रायव्हसी पॉलिसी अपडेट करू शकते आणि त्यानुसार प्रायव्हसी पॉलिसीवरील अंतिम अपडेट' तारीख बदलेल. या प्रायव्हसी पॉलिसीमधील असा कोणताही बदल गृहमने सुधारित प्रायव्हसी पॉलिसी पोस्ट केल्यावर लागू होईल. या प्रायव्हसी पॉलिसीमधील बदल पोस्ट केले जातील जेणेकरून तुम्हाला नेहमीच माहित होईल की गृहम कोणती माहिती गोळा करत आहे, ती माहिती ती कशी वापरली जाऊ शकते आणि गृहम ती कोणत्याही थर्ड पार्टीला उघड करेल का.
तुमचा वेबसाईटचा सततचा वापर या प्रायव्हसी पॉलिसी आणि त्यातील कोणत्याही अपडेट्ससाठी तुमची सहमती मानली जाईल. जर तुम्हाला तुमची माहिती वापरण्याची आणि उघड करण्याची सहमती मागे घ्यायची असेल, तर तुम्ही गृहमला customersupport@grihumhousing.com या ईमेलवर संपर्क साधून अटी व शर्तींची तुमची सहमती मागे घेतल्याची माहिती द्यावी. अशा परिस्थितीत ही प्रायव्हसी पॉलिसी आपोआप लागू होणे बंद होईल. कृपया लक्षात ठेवा की प्रायव्हसी पॉलिसीद्वारे प्रदान केलेल्या वापरासाठी स्वीकृती आणि प्रकटीकरण मागे घेतल्यास,गृहमला वेबसाईट अंतर्गत सेवा प्रदान न करण्याचा पर्याय असेल.
जर कधी तुम्हाला तुमच्या वैयक्तिक माहितीच्या किंवा संवेदनशील वैयक्तिक माहितीच्या उल्लंघनाबाबत तक्रारी किंवा विसंगती असली तर, तुम्ही तक्रार अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकता. तपशील खाली दिले आहेत:
6th फ्लोअर, B बिल्डिंग, गंगा ट्रूनो, लोहेगाव, पुणे, महाराष्ट्र 411014
टेलिफोन नं.: +91 020 67808091
ईमेल ID: data.officer@grihumhousing.com
मुलांचे संरक्षण:
गृहम भारतीय कायद्यानुसार अल्पवयीन मानल्या जाणाऱ्या व्यक्तींना म्हणजेच 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना आपली सेवा देत नाही आणि त्यांना लक्ष्य करत नाही. भारतीय कायद्यांचे अनुपालन करताना, गृहमला ते अल्पवयीन असल्याचे वाटतात अशी माहिती लोकांकडून मिळाल्यास ती माहिती गृहमच्या डाटाबेसमधून काढून टाकली जाईल. तसेच, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट, 2000 च्या सेक्शन 67B चे उल्लंघन करणारा कोणताही कंटेंट किंवा माहिती, जसे की मुलांचे लैंगिक स्वरूपात चित्रण आणि जे बाल शोषणाची सुविधा देते, ती गृहम तर्फे हटवली जाईल आणि अशा युजरला एकतर्फी पणे सेवेतून वगळले जाईल.
प्रभावी तारीख:
या पेजवरील बदल पोस्ट करून कधीही या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल करण्याचे अधिकार गृहम कडे राखीव असतात. या पेजवर दिलेली प्रभावी तारीख म्हणजे प्रायव्हसी पॉलिसी मधील शेवटची रिव्हिजन तारीख असेल. गृहम तुम्हाला प्रायव्हसी पॉलिसी मधील महत्त्वपूर्ण बदलांबाबत प्राथमिक ईमेल ॲड्रेसवर नोटीस पाठवून किंवा वेबसाईटवर एक स्पष्ट सूचना देऊन सुचित करू शकते. हे युजरला वेबसाईटमध्ये केलेल्या कोणत्याही बदलाची किंवा त्यावर उपलब्ध असलेल्या माहितीची जाणीव ठेवण्यापासून दूर करत नाही. तुमचा वेबसाईट वापर अद्ययावत प्रायव्हसी पॉलिसी पोस्ट झाल्यानंतर सुरू राहणे म्हणजे तुम्ही त्या बदलांना मान्यता देता, असे समजले जाईल.
प्रायव्हसी पॉलिसी अंतिम 14/07/2021 रोजी 12:16 pm वाजता सुधारित केली आहे.