कृपया कायदेशीर अस्वीकृतीच्या अटी व शर्ती ("कायदेशीर अस्वीकृती") काळजीपूर्वक वाचा. या कायदेशीर अस्वीकृती तुमच्या आणि गृहम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमधील कायदेशीररित्या बंधनकारक ॲग्रीमेंट आहेत, ज्या गृहमच्या प्रोफाईल, माहिती, प्रॉडक्ट्स आणि सेवेसाठी www.grihumhousing.com अंतर्गत अटी व शर्ती स्थापित करतात आणि त्यांच्या सेवा ("सेवा") प्राप्त करणाऱ्या विविध युजरसह संवाद साधण्यास मदत करतात. वेबसाईट किंवा त्यातील कोणतेही पेज ॲक्सेस करून आणि/किंवा वेबसाईटवर किंवा त्याद्वारे प्रदान केलेली माहिती वापरून, तुम्ही त्यामध्ये समाविष्ट कायदेशीर अस्वीकृती आणि अटींशी बांधील राहण्यास सहमत आहात. विशिष्ट प्रॉडक्ट्स आणि सेवांच्या अटी व शर्ती आणि कायदेशीर अस्वीकृती यांच्यातील कोणत्याही संघर्षाच्या स्थितीत, अशा प्रॉडक्ट्स आणि सेवांसाठी विशिष्ट अटी लागू होतील. जर तुम्ही वरील कोणत्याही कायदेशीर अस्वीकृतींशी सहमत नसाल तर कृपया गृहमच्या कोणत्याही पेजवरील माहिती वाचू नका. येथे समाविष्ट अटी, शर्ती आणि सूचनांमध्ये सुधारणा न करता तुमच्या स्वीकृतीवर वेबसाईट तुम्हाला ऑफर केली जाते. या वेबसाईटचा वापर केल्याने तुम्ही कायदेशीर अस्वीकृती मधील सर्व अटी, शर्ती आणि नोटिशींना सहमती दिल्याचे मानले जाईल.
या वेबसाईटवर असलेली माहिती, कंटेंट, साहित्य, डाटा, बातम्या, प्रॉडक्ट्स (टेक्स्ट, कंटेंट, फोटो, ग्राफिक्स, व्हिडिओ आणि ऑडिओ कंटेंटसह, परंतु त्यापुरते मर्यादित नाही) फायनान्शियल डाटा, बातम्या, संशोधन, शिफारसी आणि मते किंवा इतर आर्थिक माहिती ("कंटेंट") केवळ सामान्य माहितीसाठी दिली आहे आणि बिझनेस/कमर्शियल निर्णय घेण्यासाठी आधार म्हणून वापरली जाऊ नये. या वेबसाईट वरील कंटेंटवर आधारित कोणत्याही इन्व्हेस्टमेंट किंवा फायनान्शियल दायित्वात प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला योग्य ती काळजी घेण्याचा आणि/किंवा स्वतंत्र सल्ला घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. गृहमने ही वेबसाईट गृहम, त्यांच्या ग्रुप कंपन्या, सहाय्यक, पुरवठादार, एजंट किंवा परवानाधारक, त्यांचे प्रॉडक्ट्स आणि सेवा यांच्या विषयी माहिती पोहोचवण्यासाठी आणि तुमच्यासोबत सामान्य संवाद साधण्यासाठी साधन म्हणून राखली आहे, ही माहिती कोणत्याही प्रकारे तुमच्यासाठी सल्ला म्हणून समजली जाऊ नये.
या वेबसाईटवरील मजकूर, ग्राफिक्स, लिंक्स आणि इतर सर्व सामग्री “जशी आहे तशी” आणि “उपलब्धतेनुसार” दिली जाते आणि ती कॉपीराइट द्वारे संरक्षित आहे. गृहमची स्पष्ट आणि पूर्व-लिखीत संमतीशिवाय तुम्ही हा मजकूर किंवा ग्राफिक्स इतर कोणालाही वितरित करू शकत नाही. गृहमची स्पष्ट आणि पूर्व-लिखित परवानगी नसताना या वेबसाईटवरील कोणतीही सामग्री कॉपी करणे, डाउनलोड करणे, पब्लिश करणे, वितरित करणे किंवा कोणत्याही स्वरूपात पुनरुत्पादित करणे पूर्णपणे प्रतिबंधित आहे.
या वेबसाईटवरील सामग्रीला गृहम, त्याच्या ग्रुप कंपन्या, सहाय्यक कंपन्या किंवा कोणत्याही संबंधित संस्थांच्या स्कीम घेण्यासाठी केलेली ऑफर, विनंती, आमंत्रण, सल्ला किंवा शिफारस असे समजू नये. तुम्ही या वेबसाईटवर दिलेल्या माहितीवर, प्रॉडक्ट्सवर आणि/किंवा सेवांवर विश्वास ठेवत असाल, तर त्याची पूर्ण जबाबदारी तुमची स्वतःची आहे. तुम्हाला हे समजले आहे आणि तुम्ही स्वीकार करत आहात की, या वेबसाईटवर दिलेली माहिती, प्रॉडक्ट्स आणि सेवा यामध्ये कधी कधी विलंब, वगळणे, व्यत्यय, चुका आणि/किंवा इतर समस्या असू शकतात.
या वेबसाईटवर दिलेले प्रॉडक्ट्स किंवा सेवा काही देशांमध्ये वापरण्याची परवानगी नसेल. शंका असल्यास, असे प्रॉडक्ट्स/सेवा याबाबत माहितीची विनंती करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या स्थानिक नियामक किंवा प्राधिकरणाशी संपर्क साधावा. प्रॉडक्ट्स आणि सेवा गृहमच्या विवेकबुद्धीनुसार उपलब्ध असतात आणि त्या संबंधित प्रॉडक्ट्स आणि सेवांसाठी लागू असलेल्या वैयक्तिक ॲग्रीमेंटच्या अटींवर आधारित असतात. हे प्रॉडक्ट्स किंवा सेवा कोणत्याही वेळी कोणत्याही सूचनेशिवाय विद्ड्रॉ किंवा सुधारित केले जाऊ शकतात. सर्व प्रॉडक्ट्स किंवा सेवा प्रत्येक ठिकाणी उपलब्ध असतीलच असे नाही.
वेबसाईटवर दिलेल्या किंवा उपलब्ध असलेल्या माहितीमध्ये काही ठिकाणी चुका असू शकतात किंवा टायपोग्राफिकल एरर असू शकतात. गृहमने वेबसाईटवर दिली जाणारी माहिती अचूक आणि विश्वासार्ह राहावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले असले तरी, आढळणाऱ्या कोणत्याही चुका अनवधानाने झालेल्या आहेत आणि पूर्णपणे नजरचुकीमुळे आहेत.
गृहम, ग्रुप कंपन्या, उपकंपन्या, सहयोगी, पुरवठादार, एजंट किंवा परवानाधारक सेवेद्वारे उपलब्ध असलेल्या माहितीची किंवा या सेवेद्वारे संदर्भित, जाहिरात केलेल्या किंवा विकल्या जाणार्या कोणत्याही माहिती, वस्तू किंवा सेवांची विशिष्ट उद्देशासाठी अचूकता, पूर्णता, शुद्धता, उल्लंघन न करणे, व्यापारक्षमता किंवा योग्यतेची हमी देऊ शकत नाहीत आणि देत नाहीत. गृहम, ग्रुप कंपन्या, उपकंपन्या, सहयोगी, पुरवठादार, एजंट किंवा परवानाधारक वेबसाईटवरील ही माहिती एरर मुक्त किंवा सतत उपलब्ध असेल किंवा सेवा व्हायरस किंवा इतर हानिकारक घटकांपासून मुक्त असेल याची हमी देत नाहीत. गृहम, ग्रुप कंपन्या, उपकंपन्या, सहयोगी, पुरवठादार, एजंट किंवा परवानाधारक माहिती, प्रॉडक्ट, सेवांशी संबंधित सर्व वॉरंटी आणि अटी नाकारतात, ज्यामध्ये सर्व निहित वॉरंटी आणि व्यापारक्षमता, विशिष्ट उद्देशासाठी योग्यता, शीर्षक आणि उल्लंघन न करण्याच्या अटींचा समावेश आहे. या वेबसाईटद्वारे कोणत्याही क्लायंटला पाठवलेली किंवा या वेबसाईटवर उपलब्ध असलेली कोणतीही माहिती गृहम, किंवा तिच्या ग्रुप कंपन्या, उपकंपन्या किंवा सहयोगी कंपन्यांकडून कोणत्याही कंपनी किंवा इतर कायदेशीर घटकाची किंवा अशा घटकाद्वारे चालवल्या जाणार्या बिझनेसची क्रेडिट पात्रता, आर्थिक कामगिरी किंवा संभाव्यता, दिवाळखोरी किंवा व्यवहार्यता याबद्दल कोणतेही प्रतिनिधित्व किंवा हमी देणार नाही.
या वेबसाईटवर विविध व्यावसायिक/तज्ञ/विश्लेषक इ. चे सल्ले/मत आणि विधाने असू शकतात. गृहम अशा व्यक्तीच्या कोणत्याही मतांची/विधानांची/माहितीची अचूकता, विश्वासार्हता दर्शवत नाही/त्याचे समर्थन करत नाही. या विधानांवर अवलंबून राहणे हे या वेबसाईट युजरच्या जोखमीवर असेल. या वेबसाईटवर प्रदान केलेल्या कोणत्याही मतांची, सेवांची किंवा इतर माहितीची अचूकता, पूर्णता, विश्वासार्हता आणि उपयुक्तता स्वतंत्रपणे पडताळणे आणि मूल्यांकन करणे ही या वेबसाईट युजरची जबाबदारी आहे. या वेबसाईटवरील सर्व माहिती अशी समजून आणि स्वीकारून दिली जात आहे की, ही माहिती लीगल, अकाउंटिंग, टॅक्स, फायनान्शियल, इन्व्हेस्टमेंट किंवा इतर व्यावसायिक सल्ला म्हणून घेतली जाऊ नये, तसेच विशिष्ट तथ्ये किंवा बाबींवर सल्ला म्हणून अवलंबली जाऊ नये.
गृहम कोणत्याही वेळी (असे करण्यास बांधील नसताना) कोणतीही पूर्वसूचना न देता, या वेबसाईटवर उपलब्ध असलेली कोणतीही माहिती पूर्णपणे किंवा अंशतः अपडेट, एडिट, बदल किंवा हटवू शकते. अशा कोणत्याही बदलांनंतर उद्भवणारा तोटा, नुकसान किंवा जबाबदारी याबाबत गृहम जबाबदार राहणार नाही. येथे समाविष्ट असलेल्या कोणत्याही गोष्टीचा अर्थ कोणत्याही प्रॉडक्टचा किंवा प्रोसेसचा वापर करण्याची शिफारस म्हणून लावला जाऊ नये तसेच, त्या प्रॉडक्टचा वापर केल्याने कोणत्याही बौद्धिक संपदा हक्कांचे उल्लंघन होणार नाही, किंवा इतर कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबतही गृहम कोणतीही स्पष्ट किंवा अप्रत्यक्ष हमी देत नाही. वापरकर्त्याने या वेबसाईटवरील माहितीमध्ये होणारे बदल नियमितपणे तपासणे अपेक्षित आहे. अशा बदलांविषयी वापरकर्त्याला स्वतंत्रपणे कळवण्याची जबाबदारी गृहमची नाही. गृहम या वेबसाईटवरील माहिती विश्वसनीय स्रोतांकडून घेण्याचा प्रयत्न करेल, परंतु त्या माहितीची पूर्णता किंवा अचूकता याबाबत कोणतीही हमी देत नाही.
कोणत्याही परिस्थितीत गृहम, तिच्या ग्रुप कंपन्या, उपकंपन्या, सहयोगी, पुरवठादार, एजंट किंवा परवानाधारक तुम्हाला किंवा इतर कोणालाही कोणत्याही नुकसानीसाठी जबाबदार राहणार नाहीत, ज्यामध्ये मर्यादेशिवाय, परिणामी, विशेष, आकस्मिक, अप्रत्यक्ष, दंडात्मक, अनुकरणीय किंवा कोणत्याही प्रकारच्या इतर नुकसानांसाठी कोणतीही जबाबदारी समाविष्ट आहे, जरी अशा नुकसानाच्या शक्यतेचा सल्ला दिला गेला असला तरीही. या वेबसाईटमध्ये आणि संबंधित वेब पेजवर समाविष्ट सामग्री ही सामान्य माहिती आहे आणि त्याचा उद्देश कोणत्याही प्रकरणात सल्ला देण्याचा नाही. येथे असलेल्या माहितीच्या आधारे कृती करण्यापूर्वी सबस्क्रायबर्स आणि युजर्सनी व्यावसायिक सल्ला घ्यावा. कोणत्याही फायनान्शियल प्रॉडक्ट किंवा संधी किंवा स्वरुप किंवा योग्यता किंवा निवड किंवा कोणत्याही प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसची व्यवहार्यता यासंबंधीचा निर्णय नेहमीच सबस्क्रायबर आणि युजरची संपूर्ण जबाबदारी आणि निर्णय असेल.
वेबसाईटचा वापर करताना तुम्ही येथे उपलब्ध कोणतीही डाउनलोड करण्यायोग्य सामग्री फक्त पर्सनल आणि नॉन-कमर्शिअल वापरासाठी डाउनलोड करू शकता, फक्त अशी अट आहे की तुम्ही त्या सामग्री वरील सर्व कॉपीराईट आणि इतर मालकी हक्कांचे उल्लंघन न करावे. वेबसाईटचा वापर करून डाउनलोड केलेली किंवा मिळवलेली कोणतीही सामग्री ही पूर्णपणे तुमच्या स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार आणि जोखमीवर आहे आणि गृहम तुमच्या कॉम्प्युटर सिस्टीमच्या कोणत्याही नुकसानीसाठी, अशा कोणत्याही सामग्रीचे डाउनलोड करण्यामुळे होणार्या डाटा नुकसानीसाठी आणि प्रॉपर्टीचे नुकसान किंवा अन्यथा यासह कोणत्याही प्रकारचे नुकसानीसाठी किंवा हानीसाठी जबाबदार असणार नाही.
तथापि, तुम्ही गृहमची पूर्व-लिखित परवानगी घेतल्याशिवाय सार्वजनिक किंवा व्यावसायिक वापरासाठी वेबसाईटवरील टेक्स्ट, फोटो, ऑडिओ आणि व्हिडिओ यांसह कंटेंटचे वितरण करू नये, तो बदलू नये, तो ट्रान्समिट करू नये, पुनर्वापर करू नये, तो रिपोर्ट करू नये किंवा त्याचा वापर करू नये.
या वेबसाईटचा तुमचा ॲक्सेस आणि वापर हा www.grihumhousing.com/terms-and-conditions वर उपलब्ध असलेल्या ("अटी व शर्ती"), www.grihumhousing.com/privacy-policy वर उपलब्ध असलेल्या प्रायव्हसी पॉलिसी, तसेच सर्व लागू असलेल्या कायदे, नियम, अधिसूचना आणि परिपत्रकांच्या अधीन आहे. वेबसाईट ॲक्सेस करून आणि ब्राउज करून, तुम्ही कोणत्याही अटी किंवा शर्ती शिवाय, अटी व शर्ती स्वीकारत आहात आणि गृहमच्या प्रायव्हसी पॉलिसीचे पालन करण्यास सहमत आहात.
कंटेंट आणि ट्रेडमार्क, सर्व्हिस मार्क्स, ट्रेडची नावे, आयकॉन्स आणि लोगो ("चिन्हे"), ज्यामध्ये "गृहम" आणि गृहम लोगो या मर्यादेशिवाय संज्ञा समाविष्ट आहेत, ते गृहमच्या मालकीचे आहेत. शिवाय, वेबसाईटवर वापरलेला सर्व कंटेंट आणि फोटो गृहमच्या मालकीचा आणि परवानाकृत आहे आणि त्यांचा कोणताही अनधिकृत वापर प्रतिबंधित आहे. गृहम, त्यांच्या ग्रुप कंपन्या, सहाय्यक किंवा सहयोगी हे प्रॉडक्ट्स आणि सेवांच्या नावांचे मालक आहेत आणि ते बौद्धिक प्रॉपर्टीचा पूर्व वापर/रजिस्टर्ड मालक म्हणून त्यांचे हक्क राखून ठेवतात ज्यामध्ये ट्रेडमार्क आणि अशा नावांमध्ये निहित कॉपीराईट समाविष्ट आहे आणि त्यापुरते मर्यादित नाहीत. येथे समाविष्ट असलेल्या कोणत्याही गोष्टीचा अर्थ असा केला जाणार नाही की, गृहमच्या बौद्धिक प्रॉपर्टीमध्ये कोणताही परवाना, नियुक्ती, ट्रान्सफर प्रदान केले आहे ज्यामध्ये ट्रेडमार्क किंवा कॉपीराइट समाविष्ट आहे आणि मर्यादित नाही. ग्रिहम वेबसाईटवर किंवा त्याद्वारे प्रदान केलेल्या सर्व माहितीच्या संबंधात (सर्व टेक्स्ट ग्राफिक्स आणि लोगोसह) सर्व अधिकार (कॉपीराईट, ट्रेडमार्क, पेटंट तसेच इतर कोणत्याही बौद्धिक संपदा अधिकारांसह) राखून ठेवते. वेबसाइट आणि कंटेंटमध्ये स्पष्टपणे मंजूर न केलेले सर्व अधिकार गृहम राखून ठेवते.
गृहम, ग्रुप कंपन्या, उपकंपन्या किंवा सहयोगी कंपन्या कोणतीही लिस्टिंग कोणत्याही वेळी, कोणत्याही कारणास्तव/कारणाशिवाय रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवतात. तसेच, कोणालाही कोणत्याही वेळी, कारणासह/ कारणाशिवाय, सेवांचा ॲक्सेस देणे मर्यादित करण्याचा किंवा बंद करण्याचा अधिकारही राखून ठेवतात. तुम्ही या सेवेवर किंवा या सेवेच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या कोणत्याही माहितीवर अवलंबून राहिलात, तर त्याची पूर्ण जबाबदारी तुमची स्वतःची आहे.
तुम्ही सहमत आहात की तुम्ही या वेबसाईटवर प्रसारित केलेली कोणतीही सामग्री, माहिती आणि कल्पना गृहम, त्यांच्या ग्रुप कंपन्या, सहाय्यक आणि/किंवा सहयोगींची प्रॉपर्टी असेल आणि राहील. सर्व ट्रान्समिशनला नॉन-कॉन्फिडेन्शियल आणि नॉन-प्रोप्रायटरी मानले जाईल आणि गृहम, त्यांच्या ग्रुप कंपन्या, सहाय्यक किंवा सहयोगी अशा माहितीच्या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या दायित्वाखाली नसतील आणि ते इतरांना ट्रान्समिशनचे पुनरुत्पादन, वापर, उघड करणे आणि मर्यादेशिवाय वितरित करण्यास मुक्त असतील. याव्यतिरिक्त, गृहम त्यांच्या ग्रुप कंपन्या, सहाय्यक किंवा सहयोगी कोणत्याही उद्देशासाठी, त्यात मर्यादा न ठेवता, अशा माहितीतील कोणत्याही कल्पना, संकल्पना, ज्ञान किंवा तंत्रज्ञान वापरण्यास मोकळ्या असतील, ज्यात त्याच माहितीचा समावेश करून सेवा विकसित करणे किंवा मार्केट करणे यांचा समावेश असू शकतो.
तुम्ही सहमत आहात, आणि याबाबत तुम्हाला सूचित केले जाते, की या वेबसाईटवर किंवा या वेबसाईटवरून बेकायदेशीर, धमकी देणारा, मानहानीकारक, बदनामीकारक, प्रक्षोभक, पोर्नोग्राफिक, धर्म निंदक किंवा कोणताही असा मजकूर जो कोणत्याही नागरी किंवा फौजदारी दायित्वास कारणीभूत ठरू शकतो, तो पोस्ट करणे किंवा ट्रान्समिट करणे पूर्णपणे प्रतिबंधित आहे. तुम्ही केलेल्या कोणत्याही कमेंट्सच्या मजकूरासाठी तुम्ही स्वतः पूर्णपणे जबाबदार आहात, आणि गृहम आपल्या विवेकबुद्धीनुसार आणि कोणतीही पूर्वसूचना न देता असा मजकूर कधीही हटवू शकते.
गृहम, त्यांच्या ग्रुप कंपन्या, उपकंपन्या किंवा संलग्न संस्था या ‘टर्म्स ऑफ यूज’ मध्ये बदल करू शकतात. तुम्ही सहमत आहात की या अटी व शर्तींचा कोणताही भाग अंमलबजावणी करण्यायोग्य नसल्याचे आढळल्यास, उर्वरित अटी व शर्ती पूर्णपणे लागू राहतील. या वेबसाईटचा वापर करून, तुम्ही अशा कोणत्याही बदलांना बांधील राहण्यास सहमत आहात आणि त्यामुळे, सध्याच्या लागू असलेल्या अटी जाणून घेण्यासाठी तुम्ही नियमितपणे या पेजला भेट देणे आवश्यक आहे.
गृहम वेबसाईटद्वारे, वेबसाईटला व्हिजिट देणाऱ्यांची काही माहिती गोळा केली जाऊ शकते. यात व्हिजिटर्सची ऑपरेटिंग सिस्टिम, ब्राऊजर, डोमेनचे नाव आणि वेबसाईटवरील कोणत्या पेजला भेट दिली गेली आहे यासारखी माहिती समाविष्ट असते. वेबसाईट व्हिजिटर्सना गृहम हे सूचित करते की, जेव्हा ते वेबसाईटला व्हिजिट करतात तेव्हा गृहम त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये "कुकी" किंवा तत्सम फाईल स्वरूपात काही माहिती सेव्ह करू शकते. या फाईल्स मुळे युजरच्या पसंती, पूर्वीच्या निवडी किंवा वापराच्या सवयी यानुसार गृहमला वेबसाईट सानुकूलित करता येते. बहुतेक वेब ब्राऊजर वेब युजर्सना त्यांच्या कॉम्प्युटरवरील अशा फाईल्सवर कंट्रोल ठेवण्याची सुविधा देतात - जसे की त्या फाईल्स डिलीट करणे, ब्लॉक करणे किंवा अशा फाईल्स सेव्ह केल्या गेल्या की त्याची नोटिफिकेशन मिळवणे. वेबसाईट व्हिजिटर्सनी या सुविधांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी त्यांच्या ब्राऊजर मधील सूचना पाहाव्यात.
या वेबसाइटमध्ये गृहमच्या उपकंपन्या आणि सहयोगी कंपन्यांच्या इतर वेबसाईट्सच्या लिंक्स असू शकतात. या वेबसाईटमध्ये बाह्य वेबसाइट्सच्या लिंक्स देखील असू शकतात, ज्यांच्याशी पुढील लिंक केलेल्या वेबसाईट्स आहेत, ज्या थर्ड पार्टीद्वारे कंट्रोल किंवा ऑफर केल्या जातात (गृहमच्या गैर-संलग्न संस्था) जेणेकरून तुम्हाला संबंधित वेबसाईट्स, सेवा आणि/किंवा प्रॉडक्ट्स जलद आणि सहजपणे शोधता येतील. अशा लिंक केलेल्या वेबसाईट्सवर प्रदर्शित केलेला कंटेंट किंवा प्रॉडक्ट्स/सेवा, किंवा प्रॉडक्ट्सची/सेवांची कोणतीही गुणवत्ता गृहम द्वारे मान्यताप्राप्त, सत्यापित किंवा देखरेख केलेली नाही. गृहम अशा बाह्य वेबसाईट्सच्या मालकांसाठी किंवा ऑपरेटरसाठी किंवा ते पुरवत असलेल्या कोणत्याही प्रॉडक्ट्ससाठी किंवा सेवांसाठी किंवा त्यांच्या वेबसाईट्सच्या कंटेंटसाठी जबाबदार नाही आणि कोणत्याही अटी, वॉरंटी, स्पष्ट किंवा निहित; किंवा यापैकी कोणाशीही संबंधित इतर अटी किंवा प्रतिनिधित्व देत नाही किंवा त्यात प्रवेश करत नाही किंवा यापैकी कोणत्याही शी संबंधित कोणतेही दायित्व स्वीकारत नाही (या वेबसाईटमध्ये लिंक समाविष्ट असलेल्या कोणत्याही बाह्य वेबसाईटची कंटेट कोणत्याही थर्ड पार्टीच्या बौद्धिक संपदा अधिकारांचे उल्लंघन करते या दाव्यामुळे उद्भवणारे कोणतेही दायित्व समाविष्ट आहे).
गृहम याद्वारे कोणत्याही अधिकारक्षेत्राच्या कायद्यांद्वारे लागू केलेल्या कोणत्याही प्रकारच्या अप्रत्यक्ष हमींबाबत स्पष्टपणे नकार देत आहे. सर्व विवाद आणि कायदेशीर विषयांचे निराकरण केवळ भारतातील पुणे न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रातच केले जाईल. सर्व विवाद अटी व शर्तींमध्ये दिलेल्या तरतुदीनुसार लवादाकडे पाठविले जाईल.
गृहम कोणत्याही लागू असलेल्या कायद्याचे, विनियमांचे, कायदेशीर प्रक्रियेचे किंवा सरकारी मागणीचे पालन करण्यासाठी जेवढी माहिती उघड करणे आवश्यक असेल, ती माहिती उघड करण्याचा हक्क नेहमी राखून ठेवते. तसेच गृहम आपल्या विवेकबुद्धीनुसार आणि कोणतीही पूर्वसूचना न देता कोणतीही माहिती, प्रॉडक्ट किंवा सेवा, पूर्णपणे किंवा अंशतः, एडिट करण्याचा, पोस्ट करण्यास नकार देण्याचा किंवा हटविण्याचा अधिकार राखून ठेवते.
तुम्ही केलेल्या सबमिशनच्या वापरासाठी, इथे नमूद केल्याप्रमाणे, कोणत्याही प्रकारची भरपाई दिली जाणार नाही. तुम्ही दिलेले कोणतेही सबमिशन गृहमला पोस्ट करण्याचे किंवा वापरण्याचे कोणतेही बंधन नाही आणि गृहम आपल्या विवेकबुद्धीनुसार कोणतेही सबमिशन कोणत्याही वेळी, कोणतीही पूर्वसूचना न देता, हटवू शकते.
तुमचे सबमिशन पोस्ट करून, अपलोड करून, इनपुट करून, प्रदान करून किंवा सबमिट करून तुम्ही हमी देता आणि प्रतिनिधित्व करता की या सेक्शनमध्ये वर्णन केल्याप्रमाणे तुमच्या सबमिशनचे सर्व अधिकार तुमच्या मालकीचे आहेत किंवा अन्यथा नियंत्रित आहेत, ज्यामध्ये, मर्यादेशिवाय, सबमिशन प्रदान करण्यासाठी, पोस्ट करण्यासाठी, अपलोड करण्यासाठी, इनपुट करण्यासाठी किंवा सबमिट करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व अधिकार समाविष्ट आहेत.
वेबसाईटवरून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले सॉफ्टवेअर (जर असल्यास) आणि कम्युनिकेशन सेवेद्वारे एंड-यूजर्सने उपलब्ध करून दिलेले सॉफ्टवेअर वगळता, ("सॉफ्टवेअर") हे सॉफ्टवेअर प्रोव्हायडरचे एंड वर्क असते. या सॉफ्टवेअरचा तुमचा वापर एंड यूजर लायसन्स ॲग्रीमेंटच्या अटींद्वारे कंट्रोल केला जातो, जर असेल तर, जो सॉफ्टवेअरसह असेल किंवा त्यात समाविष्ट असेल ("लायसन्स ॲग्रीमेंट"). तुम्ही लायसन्स ॲग्रीमेंटच्या अटींशी सहमत नसल्यास, तुम्ही लायसन्स ॲग्रीमेंटसह असलेले किंवा समाविष्ट असलेले कोणतेही सॉफ्टवेअर इंस्टॉल करू शकत नाही किंवा वापरू शकत नाही.
गृहम आपल्या विवेकबुद्धीनुसार, कोणतीही पूर्वसूचना न देता, कोणत्याही वेळी तुमचा या वेबसाईटवरील किंवा संबंधित सेवांवरील काही किंवा सर्व ॲक्सेस बंद करण्याचा अधिकार राखून ठेवते.
गृहम, त्याच्या ग्रुप कंपन्या, पुरवठादार, सेवा भागीदार, एजंट, कर्मचारी, परवानाधारक, सल्लागार, अधिकारी आणि डायरेक्टर या वेबसाईटच्या तुमच्या वापरामुळे किंवा कोणत्याही लिंक केलेल्या साईटच्या किंवा कोणत्याही पार्टीद्वारे वापरण्याच्या असमर्थतेमुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे (विशेष, प्रासंगिक किंवा परिणामी, दंडात्मक किंवा अनुकरणीय नुकसान, हानी किंवा खर्च, महसूल किंवा नफा, बिझनेसचे नुकसान किंवा डाटाचे नुकसान) उद्भवणार्या कोणत्याही नुकसानीसाठी किंवा हानीसाठी जबाबदार असणार नाहीत, अन्यथा कसेही असले तरीही या वेबसाईट, त्याच्या कंटेंटमध्ये किंवा संबंधित सेवांमध्ये कोणताही दोष, एरर, वगळणे, व्यत्यय, अपूर्णता, उणीव, चूक किंवा अयोग्यता यामुळे किंवा वेबसाईट किंवा त्याच्या कोणत्याही भागाच्या किंवा कोणत्याही कंटेंटमध्ये किंवा संबंधित सेवांच्या अनुपलब्धतेमुळे उद्भवणारे परंतु त्यापुरते मर्यादित नसलेले कोणतेही नुकसान, हानी किंवा खर्च काहीही असो, जरी संस्थांना अशा नुकसान, तोटा किंवा खर्चाच्या शक्यतेबद्दल सूचित केले असले तरीही.